म्युच्युअल फंडामध्ये वेगवेगळ्या संकल्पना

म्युच्युअल फंडामध्ये युनिट्स म्हणजे काय?

म्युच्युअल फंड कंपनी अनेक लोकांकडील पैसे एकत्रितपणे समभाग, बाँड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स किंवा यामध्ये काही गुंतवणूकीसाठी गुंतवणूक करते. … म्युच्युअल फंडाच्या मालकीच्या सर्वात लहान भागास एक युनिट म्हटले जाते आणि ते आपल्या कंपनीच्या गुंतवणूकीचे प्रमाण दर्शवते.

नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) (निव्वळ मालमत्ता मूल्य) म्हणजे काय?

म्युच्युअल फंड्स मधील एखाद्या स्किमची कामगिरी ही नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) ने दर्शवली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, स्किमने धारण केलेल्या सिक्युरिटीजचे बाजारमूल्य म्हणजे NAV. म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे सिक्युरिटीजच्या बाजारपेठेमध्ये गुंतवतात. सिक्युरीटीजचे बाजारमूल्य हे दर दिवशी बदलत असते, त्यामुळे स्किमची NAV देखील दिवसागणिक बदलत असते. प्रति युनिटची NAV म्हणजे एखाद्या दिवशी असलेले स्किमच्या सिक्युरिटीजचे बाजार मूल्य भागिले एकूण युनिट्सची संख्या.

सगळ्या म्युच्युअल फ़ंडातील स्किमचे NAV सेबी म्युच्युअल फंड नियमावलीनुसार हे बाजार बंद झाल्यानंतर व्यवहार संपले की घोषित केले जातात.

अधिभार(लोड) म्हणजे काय?

एका लांबच्या प्रवासात काही वेळा आपण एखाद्या मार्गावर प्रवेश करताना किंवा पुलावर जाताना आणि कधीकधी बाहेर पडताना आपल्याला टोल भरावा लागतो. बऱ्याच वेळा, टोल ब्रिज कंपनीला बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी फक्त काही ठराविक वर्षेच टोल आकारण्याची परवानगी असते. तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीला प्रवाशांकडून कोणताही टोल आकारण्याची परवानगी नसते.

म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीवर देखील काही असे अधिभार लागू शकतात, पण ते आपण आत्ताच वाचलेल्या टोलच्या उदाहरणापेक्षा वेगळे असतात. 2009 पर्यंत म्युच्युअल फंड मध्ये प्रवेश करताना त्यावर एक शुल्क आकारले जायचे, पण ते आता लागू केले जात नाही. काही स्किम्स या त्यामधून बाहेर पडताना एक शुल्क लागू करतात, ज्याला “निर्गमन भार (एक्झिट लोड)” असे म्हणतात.

बऱ्याच वेळा जरी निर्गमन भार (एक्झिट लोड) आकारले जात असले, तरी ते एका ठराविक कालावधीमध्ये बाहेर पडतानाच लागू केले जातात. आपण जर या कालावधीपेक्षा अधिक काळ गुंतवणूक केली, तर कोणतेही निर्गमन भार (एक्झिट लोड) लागू होत नाही. दुसर्‍या शब्दात, बऱ्याच वेळा निर्गमन भार (एक्झिट लोड) एका स्किम मधून लवकर बाहेर पडण्यापासून परावृत्त करण्याचा उद्देश साध्य करतो. त्याबरोबरच सेबीने, म्युच्युअल फंड नियामक प्राधिकरणाने देखील जास्तीत जास्त निर्गमन भार (एक्झिट लोड) किती आकारावे यावर काही निर्बंध घातले आहेत.

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) म्हणजे काय?

ईटीएफ हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, स्टॉक एक्सचेंजमध्ये एखादा साधा स्टॉक घेण्यासारखा हा म्युच्युअल फंडातील व्यवहार नसतो.

सामान्यतः ईटीएफ मधील युनिट्स मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत ब्रोकरकडून खरेदी केले आणि विकले जातात. ईटीएफ मधील युनिट्स हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट असतात आणि एनएव्ही ही बाजारातील चढ-उतारानुसार बदलते. ईटीएफचे युनिट्स हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट असल्यामुळे ते साध्या ओपन एंड इक्विटी फंड्स सारखे खरेदी केले किंवा विकले जात नाहीत. एक्सचेंजच्या कोणत्याही मर्यादांशिवाय गुंतवणूकदारत्याला हवे तेवढे युनिटस खरेदी करु शकतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ईटीएफ हे असे फंड्स आहेत जे इंडेक्सचा मागोवा घेत असतात जसे की सीएनएक्स निफ्टी किंवा बीएसई सेन्सेक्स वैगेरे. जेव्हा तुम्ही ईटीएफचे शेअर्स/युनिट्स खरेदी करता तेव्हा तुम्ही पोर्टफोलिओचे शेअर्स/युनिट्स विकत घेत असता जे त्याच्या मुख्य इंडेक्सचे उत्पन्न आणि त्यावरील परतावा ह्याचा मागोवा घेत असतात. ईटीएफ आणि इतर इंडेक्स फंड्स मधील मुख्य फरक म्हणजे ईटीएफ हे त्याच्या संबंधित इंडेक्सच्या बाहेर जाऊन कार्य करत नाहीत पण इंडेक्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. ते बाजाराला मागे टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत तर तेच बाजार होण्याचा प्रयत्न करतात.

ईटीएफमध्ये दररोज उच्चतम लिक्विडिटी असते आणि म्युच्युअल फंड स्किम्स पेक्षा फी सुद्धा कमी असते ज्यामुळे ते वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरतात.

या संबंधी आणखी वाचा : म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Leave a Reply